DOI: 10.48175/ijarsct-15317 ISSN: 2581-9429

नाशिक जिल्ह्यातील वाणिज्य विद्याशाखेत शिक्षण घेणाऱ्या युवकांच्या उद्योजकीय गुणांचे अध्ययन

प्रा. डॉ. उदय खंडू टेके
  • General Medicine

तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध होत नसल्यामुळे व्यवसाय सुरु केला जातो, परंतु व्यवसाय यशासाठी ‘व्यवसाय संधी’ व ‘व्यावसायिकता’ हे दोन महत्त्वाचे घटक असतात.संधी असेल तर व्यवसाय सुरू करता येईल; पण व्यावसायिकता नसेल तर मात्र व्यवसायात यश मिळणार नाही,व्यवसायाचे अस्तित्व कायमस्वरूपी राहणार नाही.अनेक तरुण,ज्यांच्या कुटुंबात, अगोदर कुणीही व्यवसाय केलेला नाही, त्यांच्याकडे व्यवसायाची पार्श्वभूमी नाही, वारसाहक्काने येणारे सल्ले व माहिती नाही असे तरुण नोकरीच्या अभावी उद्योग सुरु करत आहेत/करणार आहेत त्यामुळे ते प्रथम पिढीच्या उद्योजक ठरणार आहेत. तरुणांच्यामध्ये ‘उद्योजकीय व्यावसायिकता’ येण्यासाठी अंगभूत गुणांची तसेच काही गुण अंगी बानविण्याची गरज आहे. उद्योजकीय कार्याचे यश हे उद्योजकाकडे असणाऱ्या गुणांचा परिणाम असते असे म्हणणे अयोग्य ठरणार नाही.ही उद्योजकीय कौशल्ये अथवा गुणांच्या बाबतीत नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयीन तरुणांची स्थिती काय आहे हे अभ्यासले आहे. यासाठी नाशिक जिल्ह्यातील वाणिज्य विद्याशाखेत पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी अभ्यासले आहेत.

More from our Archive